अ‍ॅपशहर

MHT-CET च्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

MHT-CET च्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. हे विद्यार्थी परीक्षा केंद्रासाठी जिल्ह्याचे पसंतीक्रम बदलू शकणार आहेत. कधीपर्यंत बदलता येणार परीक्षा केंद्र? वाचा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2020, 11:13 am
MHT-CET 2020 साठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने मोठा दिलासा दिला आहे. कोविड - १९ संक्रमण स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अर्जांमधील परीक्षा केंद्रांच्या पसंतीक्रमांमध्ये बदल करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम एमएचटी-सीईटी


विद्यार्थी आणि पालकवर्गाची मोठ्या प्रमाणावर ही मागणी होती की राज्य सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांचे जिल्हे बदलण्याची मुभा द्यावी. कोविड - १९ विषाणूच्या संक्रमणामुळे देशभर असलेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अनेकांची कार्यालयेदेखील बंद आहेत. परिणामी अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसह आपल्या मूळ गावी गेले आहेत. परिणामी अशा वेळी परीक्षा केंद्र बदलून द्यावे अशी मागणी होत होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. यासंदर्भातली सूचना राज्य सरकारच्या सीईटी सेलने गुरुवारी ४ जून रोजी जारी केली आहे. १० जून पर्यंत विद्यार्थ्यांना हा बदल करण्यासाठी लिंक ओपन राहणार आहे.

दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही या परीक्षेच्या संदर्भातली ही माहिती ट्विट केली आहे.


सीईटी परीक्षा एप्रिल महिन्यात होणार होती. पण लॉकडाऊनमुळे ती लांबणीवर पडली. MHT-CET परीक्षा आता जुलै महिन्याच्या ४,६,७,८,९,१०,१३,१४,२८, २९,३० आणि ३१ तसेच ऑगस्ट महिन्यातील ३,४ आणि ५ या तारखांना होणार आहे. सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा : MHT-CET: बारावी बोर्ड डिटेल्स भरण्यास मुदतवाढ

आशियातील टॉप १०० शिक्षणसंस्थांमध्ये भारताच्या ८ संस्था


कसे बदलावे परीक्षा केंद्राचे शहर?

- ज्या विदयार्थ्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनी mhtcet2020.mahaonline.gov.in या पोर्टलवर जावे.

- लॉग इन आयडी आणि पासवर्ड द्यावा.

- अर्जाची लिंक उघडून परीक्षा केंद्राचे शहर बदलावे.

वाचा नोटीस -



१० जून २०२० रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत ही लिंक ओपन राहणार आहे. जिल्ह्यातील जे परीक्षा केंद्र परीक्षा घेण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या साधनांसह उपलब्ध असतील ती केंद्रे अलॉट करण्यात येतील, असे सीईटी सेलने कळवले आहे. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घेत राहावी, असे आवाहनही सीईटी सेलने केले आहे.

महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी क्लिक करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज