अ‍ॅपशहर

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या

विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांशी क्लॅश होत असल्याने सीईटी कक्षाने उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या आहेत...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2020, 9:30 am
MHT-CET Revised Dates 2020: सीईटी सेलच्या वतीने ऑक्टोबर मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होत असल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी झाल्यानंतर आता या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. आता या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात न होता ऑक्टोबर मध्ये तारखांत पुन्हा बदल केल्याचे परिपत्रक सीईटी सेलने जारी केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mht cet revised dates 2020 higher education cet exams postponed again
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या


राज्यात विद्यापीठांच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होत असून साधारण २१ ऑक्टोबपर्यंत या परीक्षा आहेत. सध्या पुनर्परीक्षार्थीच्या (बॅकलॉग) परीक्षा सुरू आहेत. याच दरम्यान परीक्षा नियमन प्राधिकरणानेही प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. प्रवेश परीक्षा द्यावी की, अंतिम वर्षांची परीक्षा द्यावी, अशा पेचात प्रवेशोत्सुक विद्यार्थी सापडले असल्याची तक्रारही प्राध्यापक संघटनेने केली होती. या मुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आठ दिवसात पुन्हा तारखा बदलाव्या लागल्या आहेत. या प्रवेश परीक्षांबाबत अधिक माहिती www.mahacet.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

एमपीएससी दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जाहीर

उच्चशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षाचे सुधारित वेळापत्रक

अभ्यासक्रम - सीईटीच्या पूर्वीच्या तारखा -- नव्या तारखा

एमपीएड - ३ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट ४ ते ७ ऑक्टोबर -- २९ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर
एमएड - ३ ऑक्टोबर -- ५ नोव्हेंबर
बीएड/एमएड सीईटी - १० ऑक्टोबर -- २७ ऑक्टोबर
एलएलबी ( पाच वर्षे) - ११ ऑक्टोबर -- ११ ऑक्टोबर
एलएलबी (तीन वर्ष) --२ आणि ३ नोव्हेंबर
बीपीएड - ११ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट १२ ते १६ ऑक्टोबर -- ४ नोव्हेंबर, फिल्ड टेस्ट ५ ते ८ नोव्हेंबर
बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड - ११ ऑक्टोबर -- १८ ऑक्टोबर
एम-आर्च सीईटी - ३ ऑक्टोबर -- २७ ऑक्टोबर
एम- एचएमसीटी - ३ ऑक्टोबर --२७ ऑक्टोबर
एमसीए - १० ऑक्टोबर -- २८ ऑक्टोबर
बी-एचएमसीटी - १० ऑक्टोबर -- १० ऑक्टोबर

पहिली ते नववीची परीक्षा कशी घ्यावी?

सीईटीचे सुधारित वेळापत्रकाचे परिपत्रक पुढीलप्रमाणे -

सीटीईचे सुधारित वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज