Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment: बारावी ते पदवीधर असलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira Bhayandar Municipal Corporation) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये औषधोपचार पर्यवेक्षक (Senior Pharmaceutical Supervisor), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Laboratory Supervisor), औषध निर्माण अधिकारी (Drug Manufacturing Officer), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) ही पदे भरली जाणार आहेत.
औषधोपचार पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे. वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीएससी डीएमएलटी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
ड्रग मॅन्यूफॅक्चरिंग पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण करणे आवश्यक आहे.प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
३ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प). ता. जि. ठाणे ४०११०१ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.