अ‍ॅपशहर

MPSC पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी; आयोगाने केलं जाहीर

येत्या रविवारी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा आता पुढील रविवारी २१ मार्च २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. यासंदर्भात आज १२ मार्च रोजी आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2021, 11:31 am
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही रविवार २१ मार्च रोजी होणार आहे. आयोगाने संकेतस्थळावर यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. दुसरीकडे, आंदोलनकर्त्या उमेदवार मात्र ही परीक्षा १४ मार्चलाच घेतली जावी या मागणीवर ठाम आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mpsc exam revised date mpsc preliminary exam will be conducted on 21 st march 2021
MPSC पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी; आयोगाने केलं जाहीर


आयोगाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की ही परीक्षा ११ मार्चच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता रविवार २१ मार्च रोजी होणार आहे. उमेदवारांना १४ मार्च २०२१ च्या परीक्षेसाठी जी प्रवेशपत्रे जारी केली होती, त्याच प्रवेशपत्रांच्या आधारे २१ मार्चच्या परीक्षेला प्रवेश देण्यात येणार आहेत.

अभियांत्रिकी आणि दुय्यम सेवा राजपत्रित परीक्षेत बदल नाही

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० शनिवारी २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेतच घेतल्या जातील, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज