MSC Recruitment 2022: बॅंक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमीटेड (Maharashtra State Cooperative Bank Limited) येथे इन्फॉर्मेशन सिक्योरीटी अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (MSC Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करता येणार आहे. ज्युनिअर ऑफिसर (Junior Officer) अंतर्गत सायबर सिक्योरीटी ऑपरेशनची (Cyber Security Operation )४ पदे, डिजिटल पेमेंट चॅनलची ३ पदे((Digital Payments Channel), सॉफ्टवेअरचे १ पद, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचे १ पद, ऑफिस डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशनचे १ पद (Officer
(Database Administrator), ऑफिस सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेशनचे (Server Administrator) १ पद भरले जाणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बीई/बीटेक कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन किंवा बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स/एमसीए/एमएससी कॉम्प्युटर सायन्स/आयटीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय ३० जून २०२२ पर्यंत २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
MSC Bank Recruitment: पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
२९ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.