अ‍ॅपशहर

UPSCत यंदा १४० हून अधिक अल्पसंख्याक उमेदवार यशस्वी

UPSCत यंदा १४० हून अधिक अल्पसंख्याक उमेदवार यशस्वी झाले आहेत...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2020, 12:24 pm
UPSC Civil Service Exams 2019: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यंदा अल्पसंख्याक समुदायातील १४० हून अधिक तरुणांनी यश मिळवले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. केंद्र सरकारने 'नयी उडान' ही योजना सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तरुणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. नयी उडान योजनेच्या माध्यमातून केंद्रीय सिव्हील सर्व्हिस परीक्षेत यश मिळवलेल्या उमेदवारांचा सन्मान करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात नकवी बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nai udaan scheme to help civil services aspirants from minority communities says union ministers
UPSCत यंदा १४० हून अधिक अल्पसंख्याक उमेदवार यशस्वी


नकवी म्हणाले, 'गेली तीन वर्षे सातत्याने अल्पसंख्याक समुदायातील सुमारे १५० युवक-युवती नागरी सेवांमध्ये येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्यचा सर्वसमावेशक धोरणामुळे हा बदल जाणवत आहे. या सरकारच्या आधी असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न झाले नाहीत.'

२०१४ च्या पूर्वी केवळ २ कोटी ९४ लाख अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती. २०१४ नंतर गेल्या ६ वर्षांत अल्पसंख्याक समुदायाच्या ४ कोटी ६० लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

यूपीएससी २०२१ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


यूपीएससी सीएपीएफ परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात

केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की केंद्राची नयी उडान योजना नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यास समुदायाच्या युवकांना मदत करेल. या योजनेच्या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्णय करणाऱ्या उमेदवारांना आर्थिक मदत करण्यात येते. २०१९ पासून या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा देखील ६ लाख रुपयांपासून वाढवून आठ लाख रुपये करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज