अ‍ॅपशहर

NEP 2020 चं उद्दिष्ट शिक्षण क्षेत्राला पुनरुज्जीवित करणं: राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवीन शिक्षण धोरण २०२० बाबत भाष्य केलं...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2020, 2:52 pm
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (NEP) संबोधित केले. ते म्हणाले, 'राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं उद्दिष्ट २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या दिशेने आपल्या शैक्षणिक प्रणालीला पुनरुज्जीवित करणे हे आहे. हे सर्व सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन एक स्फूर्तीने सळसळणारा समाज विकसित करण्याने साध्य होईल. सर्वसमावेशकता आणि गुणवत्ता ही दुहेरी उद्दिष्ट हे नवं शिक्षण धोरण गाठेल, अशी मला आशा आहे.'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nep sets vision to implement equitable vibrant education society says president kovind
NEP 2020 चं उद्दिष्ट शिक्षण क्षेत्राला पुनरुज्जीवित करणं: राष्ट्रपती


नव्या शिक्षण धोरणामुळे विद्यार्थी घोकंपट्टी आणि गुणांवर आधारित शिक्षणाच्या पलीकडे जातील. ताण निर्माण करणारं शिक्षण नवीन धोरणाला अभिप्रेत नाही, असंही कोविंद यांनी सांगितलं. ते राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजवाणी या विषयावर बोलत होते.


हे धोरण तयार करताना अडीच लाखांहून अधिक सूचनां लक्षात घेण्यात आल्या आहेत, असंही कोविंद यांनी सांगितलं. 'नवीन शिक्षण धोरण गुणांसाठी रट्टा मारण्यास प्रोत्साहित करणार नाही. विचार आणि शोध घेण्यास प्रवृत्त करेल. भारतात प्राचीन काळात जागतिक स्तरावरील शिक्षण केंद्र होते. तक्षशिला आणि नालंदा सारख्या विद्यापीठांना प्रतिष्ठित दर्जा होता. पण आज भारतातील उच्च शिक्षण संस्थांना जागतिक क्रमवारीत स्थान मिळत नाही. भारताचं नाव शिक्षणाच्या क्षेत्रातही मानाने घेतलं जाईल यासाठी पावलं उचलणं हे एनईपीचं उद्दिष्ट आहे. एनईपी २०२० च्या उद्दिष्टांपैकी एक उच्च शिक्षणाचा जीईआर २०३५ पर्यंत ५० टक्क्यांनी वाढवणं हेही आहे,' अशी माहिती कोविंद यांनी दिली.

UPSC CMS 2020 परीक्षेची तारीख जाहीर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज