अ‍ॅपशहर

एनआयओएसच्या जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द

एनआयओएस बोर्डाच्या जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jul 2020, 10:39 am
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने जुलै मध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या परीक्षा आधी मार्च २०२० मध्ये होणार होत्या, नंतर त्या परीक्षा लांबणीवर टाकत जुलै मध्ये आयोजित केल्या जाणार होत्या. मात्र देशातील कोविड - १९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा आता रद्दच करण्यात आल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nios cancels board exams 2020
एनआयओएसच्या जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द


असे होणार मूल्यांकन

जे जाहीर परिपत्रक एनआयओएसने प्रसिद्ध केलं आहे, त्यात मूल्यांकनाविषयी देखील माहिती देण्यात आली आहे. यानुसार, पहिल्या चार विषयांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम तीन विषयांच्या गुणांची सरासरी काढली जाणार आणि त्यानुसार त्यांचे मूल्यांकन करून निकाल लावला जाणार आहे.

परीक्षेला बसण्याची संधी

विद्यार्थ्यांना कोविड - १९ ची स्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे. पण ही संधी एकदाच मिळणार आहे. शिवाय या परीक्षेत विद्यार्थ्यांना जे गुण मिळतील, तेच अंतिम मानले जाणार आहेत.


ICSE: दहावी, बारावीचा निकाल जाहीर; यंदा गुणवत्ता यादी नाही
ICSE दहावी, बारावी निकालात महाराष्ट्राची कामगिरी

सीबीएसई, आयसीएसईच्या परीक्षाही रद्द

देशातील करोना संसर्ग स्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. सीबीएसई, आयसीएसई बोर्डांनी देखील यामुळे त्यांच्या प्रलंबित परीक्षा अखेर रद्दच केल्या. सीबीएसई दहावीची परीक्षा ईशान्य दिल्लीत तर बारावीची देशभरात होणार होती. या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होणार होत्या. आयसीएसईने देखील दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आणि दहावीचा निकालही शुक्रवारी जाहीर केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज