अ‍ॅपशहर

'या' राज्याच्या दहावीच्या परीक्षेत एकही नापास नाही!

करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलून जूनमध्ये घेण्यात आली...निकाल १०० टक्के लागला...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2020, 11:50 am
Tamil Nadu SSLC 2020: तामिळनाडू राज्य मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जारी झाला आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. निकाल १०० टक्के लागला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no student failed in tamil nadu 10th result 2020
'या' राज्याच्या दहावीच्या परीक्षेत एकही नापास नाही!


tnresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला एकूण ९ लाख ३९ हजार ८२९ विद्यार्थी बसले होते आणि हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४,७१,७५९ विद्यार्थी तर ४,६८,०७० विद्यार्थीनी होत्या. सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थी कांचीपुरम जिल्ह्यातील आहेत.

दहावीची परीक्षा २७ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत होणार होत्या पण करोनामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आणि जून महिन्यात घेण्यात आल्या. परिणामी निकालालाही विलंब झाला.

शाळा कधी उघडणार? काय आहे सद्यस्थिती?

नोकरीचा अनुभव मिळावा; आता पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप

याच बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकालही अलीकडेच जाहीर झाला आहे. त्यात ९२.३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. एकूण ७ लाख ९९ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज