NTA JEE Main Admit Card 2022: जेईई मुख्य २०२२ परीक्षेच्या जून सत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. जेईई मुख्य २०२२ प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in किंवा nta.nic.in वर प्रसिद्ध केले जाणार आहे. इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट nta.nic.in किंवा jeemain.ntanic.in वर तपासू शकतात. जेईई मेन २०२२ सत्र १ हे २३ जून २०२२ रोजी होणार आहे. जेईई मेन २०२२ सत्र १ परीक्षा ५०१ शहरांमध्ये आणि २२ शहरांबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मुख्य सत्र १ परीक्षांसाठी शहरांची यादी जाहीर केली होती.
ज्या उमेदवारांनी अद्याप जेईई मुख्य सत्र १ एनटीए परीक्षा सिटी इंटीमेशन स्लिप डाउनलोड केली नसेल ते आता अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in किंवा nta.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवारांना वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करावी लागेल.
JEE Main 2022 Admit Card: असे करा डाउनलोड
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in किंवा nta.nic.in वर जा.
सत्र १ प्रवेशपत्रासाठी लिंकवर क्लिक करा.
नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेसह लॉगिन करा.
प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि ते सुरक्षित ठेवा.
परीक्षेच्या तारखा बदलल्या
एनटीएने जेईई मेन २०२२ च्या जून सत्रासाठी नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार परीक्षा २३ जून ते २९ जून २०२२ या कालावधीत घेतली जाईल. देशभरातील ५०१ शहरे आणि भारताबाहेरील २२ शहरांमध्ये होणार आहेत. यापूर्वी, एनटीएने २० ते २९ जून या कालावधीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या होत्या. अधिक तपशीलांसाठी या लिंकवरून एनटीएने जाहीर केलेली नोटीस पाहता येणार आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा