अ‍ॅपशहर

मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई शहर जिल्ह्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांचे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2021, 4:51 pm
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई शहर जिल्ह्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांचे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया २२ नोव्हेंबर २०२१ रोजी पासून सुरु झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम offline admission process started for government hostels in mumbai for students
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू


राज्यातील मुंबई वगळुन इतर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत ऑफलाईन प्रवेश आवेदन पत्र प्राप्त करुन त्यासोबत जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती, २ पासपोर्ट फोटो इत्यादी जोडून आवेदनपत्र सादर करण्यात यावे.

वसतिगृहाचे नाव, पत्ता व गृहपाल संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बी.डी.डी.चाळ, वरळी-११८, मुंबई-४०००१८, संपर्क क्र. ८८३०३१६५५३ ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी-११६, बी.डी.डी.चाळ, वरळी-११६, मुंबई-४०००१८, संपर्क क्र. ८८३०३१६५५३; संत मिराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, वरळी-११६, बी.डी.डी.चाळ, वरळी-११६, मुंबई-४०००१८, संपर्क क्र. ९९८७७९०४३० असे पत्रकाद्वारे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज