अ‍ॅपशहर

दहावी, बारावीसाठी शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या

महाराष्ट्र शासनाने दहावी, बारावीसाठी शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या जिओ टीव्हीवर सुरू केल्या आहेत...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2020, 9:17 am
करोना महामारीमुळे शाळा बंद आहेत; मात्र ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. हे शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून रविवारी ५ जुलै रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तीन शैक्षणिक वाहिन्यांचे उद्घाटन केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम online classes maharashtra government launches 3 educational channels for 10th 12th students on jio tv
दहावी, बारावीसाठी शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या


दहावीचे मराठी आणि इंग्रजी माध्यम आणि बारावीच्या विज्ञान शाखेसाठी जिओ टीव्हीवरील ज्ञानगंगा या तीन शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय 'जिओ सावन'वर महावाणी रेडीओ कार्यक्रमाचे उद्घाटनही गायकवाड यांनी केले.

वर्षा गायकवाड यांनी रविवारी ५ जुलै रोजी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की, 'आज इ.१० वी मराठी व इंग्रजी माध्यम, इ.१२ वी विज्ञान शाखेसाठी जिओ टी.व्ही.वरील ज्ञानगंगा या ३ शैक्षणिक चॅनेलचे उद्घाटन केले. इतर ९ स्वतंत्र चॅनेल लवकरच येणार. जिओ सावन वर महावाणी रेडीओ कार्यक्रमाचे देखील उद्घाटन केले.'



ऑनलाइन इंटर्नशिपची संधी; कुठे, कधी वाचा...

असे होईल प्रक्षेपण
- जिओ प्लॅटफॉर्मवरील तीन वाहिन्यांवर दररोज सहा तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील
- इतर अठरा तास त्याचे पुन:प्रक्षेपण होईल
- तासिकांचे वेळापत्रक लवकरच उपलब्ध होईल
- लवकरच इतर नऊ जिओ वाहिन्या सुरू करणार
- इयत्ता दहावी (उर्दू माध्यम), इयत्ता नववी (मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यम), इयत्ता आठवी, सातवी आणि सहा
वी (इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यम) आणि इयत्ता तिसरी-चौथी (इंग्रजी, उर्दू, मराठी) वाहिनी लवकरच सुरू होणार.

CBSE आणि फेसबुक देणार डिजीटल सेफ्टीचे धडे

इयत्तानिहाय चोवीस तास वाहिनी सुरू राहणार आहे. सध्या राज्यातील जवळपास कोट्यावधी नागरिकांकडे जिओ फोन, जिओ मोबाइल आहे, त्यात ते जिओ टीव्हीद्वारे या तासिकातून अभ्यास करू शकणार आहे. याबरोबरच 'जिओ सावन'वर विद्यार्थ्यांना बोलकी पुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज