Koo Jobs: जगावर मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. यामध्ये ट्विटर, फेसबुकची मूळ मेटा, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आदी अनेक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर, ट्विटरच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्याचवेळी ट्विटर इंडियाच्या निम्म्याहून अधिक लोकांना देखील नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या कर्मचाऱ्यांना एका भारतीय कंपनीने आधार दिला आहे. भारतासह संपूर्ण जगात रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ट्विटरवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतातील ट्विटरचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कूचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरमधून काढण्यात आलेले कर्मचारी कू कंपनीत सहभागी होऊ शकतील.
ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भारतीय कंपनी आली धावून
Koo Job:भारतासह संपूर्ण जगात रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ट्विटरवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतातील ट्विटरचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कूचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरमधून काढण्यात आलेले कर्मचारी कू कंपनीत सहभागी होऊ शकतील. ट्विटरने कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आपण बोलावू इच्छित असल्याचेही त्यांनी सांगितले.
हायलाइट्स:
- ट्विटरमधून नोकरी गमावलेल्यांसाठी बातमी
- कू कंपनी देणार नोकरी
- नोकरी गेलेल्यांसाठी भारतीय कंपनी आली धावून