अ‍ॅपशहर

SCERT चं पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर

एससीईआरटीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कॅलेंडर तयार केलं आहे. हे कॅलेंडर ऑगस्टपर्यंत आहे. काय आहे या कॅलेंडरमध्ये ... वाचा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 3:59 pm
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यासाठी ‘शैक्षणिक दिनदर्शिका’ तयार केली आहे. पीडीएफ स्वरुपात हे अॅकेडमिक कॅलेंडर असून प्रत्येक इयत्तेवर क्लिक केल्यानंतर काय अभ्यास करायचा ते दिसते. या कॅलेंडरमध्ये अनेक क्लिकेबल लिंक, व्हिडिओदेखील आहेत. या कॅलेंडरचं वैशिष्ट्यं असं की कंटेंट डाऊनलोड करून तो विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीनेही पाहता येणार आहे. त्यामुळे सतत इंटरनेट डेटाची गरज भासणार नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम एससीईआरटी


२०२० - २१ या शैक्षणिक वर्षात नुकसान होऊ नये म्हणून दीक्षा ॲप, रेडिओ, टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यातूनच तंत्रस्नेही शिक्षक समुहाने पुढाकार घेऊन ‘शैक्षणिक दिनदर्शिका’ बनवली आहे. शैक्षणिक दिनदर्शिका ही ३२५ पानांची स्मार्ट पीडीएफ स्वरुपात आहे. याला फक्त डाऊनलोड करेपर्यंत इंटरनेटची आवश्‍यकता लागत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने निर्माण केलेले हे पुरक साहित्य विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांनाच लाॅक डाउनच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी पीडीफ स्वरूपात असलेल्या या दिनदर्शिकेत गणिते कोणत्या पध्दतीने सोडवायची, उजळणी कशी करायची, पाठ वाचन झाल्यावर कृती पत्रिका सोडवण्यासाठी काय करायचे? या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.

शुल्कवाढ केलेल्या शाळेविरोधात कारवाई

महाराष्ट्रात डिजीटल शिक्षण सुरु करण्याबाबत रेंज येत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही स्मार्ट पीडीएफ स्वरुपातील दिनदर्शिकेवर ज्या भागाचा अभ्यास करायचा आहे तिथे क्लिक केल्यानंतर व्हिडीओ ओपन होतो. डाऊनलोडही करता येतो. त्यामुळे पुन्हा- पुन्हा तो व्हिडीओ पाहता येत आहे. राज्यातील सर्व पालक व विद्यार्थी हे सहजपणे वापरु शकतील, असे सांगण्यात येत आहे. शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही दिनदर्शिका वापरावी अशी सूचना करण्यात आली आहे.

कोणत्या सीईटी परीक्षा लांबणीवर...पाहा एका क्लिकवर

हिंदी विषय नसल्याने शिक्षकांची नाराजी

या दिनदर्शिकेत हिंदी विषय समाविष्ट न केल्याने हिंदी शिक्षकांनी आश्चर्य आणि नाराजीही व्यक्त केली आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी देशात सर्वाधिक बोलली व लिहिली जाणाऱ्या व व्यवहारातील महत्त्वपूर्ण भाषा हिंदीला स्थान देण्यात आले नाही म्हणून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.राज्यातील अनेक शैक्षणिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर या संदर्भात संदेश प्रसारित होत आहेत. हिंदी अध्यापक ग्रुप, हिंदी अध्यापक महाराष्ट्र, हिंदी शिक्षक या सारख्या अनेक हिंदी विषय शिकणार्‍या शिक्षकांनी शैक्षणिक दिनदर्शिकेत हिंदी विषय समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. राज्य मंडळाचे माजी सदस्य उदय नरे यांनी शैक्षणिक दिनदर्शिकेची पुर्नरचना करण्याची विनंती केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज