अ‍ॅपशहर

घरांच्या भिंतीच झाल्या लॅपटॉप आणि स्मार्टफोन! सोलापुरातील शाळेची भन्नाट आयडिया

सोलापुरातील एका शाळेने डिजीटल डिव्हाइडवर एक सकारात्मक उपाय शोधला आहे. या शाळेने आसपासच्या सर्व घरांच्या भिंतींवरच चक्क विद्यार्थ्यांना अध्यापनाची कवाडे खुली केली आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2020, 4:12 pm
कोविड - १९ महामारी काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. अर्थात ऑनलाइन शिक्षण हा चॉइस नसून अपरिहार्यता झाली आहे. मात्र समाजातील तळागाळातील मुलांना अजूनही ऑनलाइन शिक्षणाची दारे खुली झालेली नाहीत, अशी ओरड होते आहे. तंत्रज्ञानाच्या अभावामुळे समाजातील ही डिजीटल दरी कोविड काळात प्रकर्षाने जाणवत आहे. पण याबाबत केवळ खंत अथवा तक्रार करत न बसता सोलापुरातील एका शाळेने त्यावर एक सकारात्मक उपाय शोधला आहे. या शाळेने आसपासच्या सर्व घरांच्या भिंतींवरच चक्क विद्यार्थ्यांना अध्यापनाची कवाडे खुली केली आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school in solapur wrote whole syllabus on walls of homes for students without access of online education
घरांच्या भिंतीच झाल्या लॅपटॉप आणि स्मार्टफोन! सोलापुरातील शाळेची भन्नाट आयडिया


सोलापूरमधील नीलमनगर भागात ही शाळा आहे. 'आशा मराठी विद्यालय' असं या प्राथमिक शाळेचं नाव आहे. नावाप्रमाणेच शाळेने विद्यार्थ्यांना करोना काळात आशेचा किरण दाखवला आहे. शाळेने नीलमनगर भागातल्या घरांच्या सुमारे ३०० भिंतींवर पहिली ते दहावीपर्यंतचा सर्व विषयांचा अभ्यास सोप्या भाषेत लिहून काढला आहे!

या शाळेचे शिक्षक राम गायकवाड सांगतात, 'यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही ठराविक भिंतीसमोर उभे राहून शिकणे सोपे झाले आहे. शिवाय सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचेही त्यामुळे पालन होत आहे.' प्राथमिक विद्यालय आणि माध्यमिक श्री धर्माना सादुल प्रशाळेत आसपासची सुमारे १७०० मुलं शिकतात. गायकवाड यांनी सांगितले की 'ही मुले गरीब घरातील आहेत. यांचे आई-वडील मजुरी करतात. बहुतांश जण जिल्ह्यातील कापड कारखान्यात काम करतात. सध्या कोविड १९ स्थितीत ऑनलाइन शिक्षण हे शिक्षणाचं नवं माध्यम झाले आहे. पण त्यासाठी उत्तम स्पीडचं नेट असणारा एक स्मार्टफोन गरजेचा आहे. पण येथील बहुतांश विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा अन्य संगणक आदी उपकरणे नाहीत. त्यामुळे यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षण देणे हे अशक्य होते.'

करोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेला फटका

त्यामुळे शाळेने आसपासच्या घरांच्या भिंतींचीच शाळा करण्याची एक योजना आखली. जे फळ्यावर शिकवणार ते शिक्षकांनी या भिंतींवर लिहिले. अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतात त्यानुसार आणि आकर्षक पद्धतीने लिहिले. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार कधीही भिंतीसमोर उभे राहून पाठ शिकतात.

राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत सिलॅबस, पुस्तके कधी तयार होणार; NCERT ने सांगितलं

काय आहे या भिंतींवर?

या भिंतींवर अक्षर, संख्या, शब्द, वाक्य प्रयोग, व्याकरण, गणिती सूत्रे, सामान्य ज्ञान आणि विविध अन्य विषयांचे पाठ समाविष्ट आहेत. अर्थात ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा अन्य उपकरणे आहेत, त्यांच्यासाठी शाळा ऑनलाइन वर्गही आयोजित करत आहे.

सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात; आदित्य ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

आशा मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक तसलीम पठाण म्हणाले, 'घरांच्या भिंतींवर पाठाचे साहित्य लिहिल्याने विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. त्यांना मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून भिंतीसमोर हवे तेव्हा येऊन शिकण्यास सांगण्यात आले आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज