अ‍ॅपशहर

९वी ते १२ वीचे विद्यार्थी २१ सप्टेंबरपासून शाळेत येऊ शकतील; पण...

केंद्र सरकारच्या नव्या सूचनांनुसार इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी २१ सप्टेंबर पासून शाळेत येऊ शकतात, पण...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2020, 12:11 pm
Unlock 4 Guidelines: केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ४ च्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यात सर्व शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत जरुरी सूचना आहेत. या ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबर पर्यंत बंदच राहणार आहेत. अनलॉक ४ चे नियम १ सप्टेंबर २०२० पासून लागू होणार आहेत. यानुसार, जरी शाळा-महाविद्यालये बंद राहण्याच्या सूचना असल्या तर २१ सप्टेंबर पासून ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त पीएचडी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते, मात्र त्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त ऑनलाइन आणि दूरशिक्षण सुरू राहणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school reopening according to unlock 4 guidelines 9th to 12th class students may come to school from 21st september
९वी ते १२ वीचे विद्यार्थी २१ सप्टेंबरपासून शाळेत येऊ शकतील; पण...


अनलॉक ४ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ५० टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन टिचिंग, टेली काउन्सेलिंग आणि संबंधित कामांसाठी शाळेत बोलावले जाऊ शकते. कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर असणाऱ्या शाळांमध्ये ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यासाठी त्यांना आई-वडिलांची लेखी परवानगी असणे आवश्यक आहे.

उच्च शिक्षण संस्था, रिसर्च स्कॉलर (PhD) आणि टेक्निकल आणि प्रोफेशनल अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवीच्या त्या विद्यार्थ्यांसाठी संस्थांच्या इमारती उघडता येतील, ज्यांना प्रयोगशाळेची आवश्यकता आहे. मात्र संस्था उघडण्याची परवानगी परिस्थितीच्या आधारे देण्यात येईल.

देशातील शाळा टप्प्याटप्प्याने 'अशा' उघडणार!

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हेही म्हटलं आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रिनरशीप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट (NIESBUD), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आंत्रप्रिनरशीप (IIE) आणि त्यांच्या प्रशिक्षण देणाऱ्यांसाठी देखील संस्था उघडण्याची परवानगी दिली जाईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज