अ‍ॅपशहर

सेबीच्या इंटर्न भरतीच्या अर्जांना मुदतवाढ

सेबीने एक वर्ष मुदतीच्या इंटर्नशीप भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jul 2020, 5:12 pm
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात SEBI ने आपल्या एक वर्ष कालावधीच्या इंटर्नशीप कार्यक्रमाच्या अर्जांना मुदतवाढ दिली आहे. अर्ज करण्याची मुदत १० जून रोजी संपली होती. ही मुदत आता ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही इंटर्नशीप सेबीच्या आर्थिक आणि नीती विश्लेषण विभागात (डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी अॅनालिसिस) आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sebi internship programme application deadline extended till 31 st july
सेबीच्या इंटर्न भरतीच्या अर्जांना मुदतवाढ


सेबीच्या आवश्यकतेनुसार, ही इंटर्नची भरती १२ महिन्यांसाठी असेल. इंटर्नला ३५ हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे. बुधवारी सेबीने जारी केलेल्या जाहीर निवेदनात म्हटले होते की या इंटर्नशीपसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशीपची संधी आहे. इच्छुकांनी आपापल्या संस्था किंवा विद्यापीठांच्या एचओडींमार्फत अर्ज करायचे आहेत. हार्ड कॉपी पुढील पत्त्यावर पाठवायची आहे -

चीफ जनरल मॅनेजर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी अॅनालिसीस १, सेबी भवन, सी ४ ए जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, महाराष्ट्र - ४०००५१

CBSE ने अभ्यासक्रमातून वगळले 'हे' विषय

पात्रता

- उमेदवारांनी त्यांच्या पूर्ण वेळ पीएडची अभ्यासक्रमातील किमान दोन वर्षे मान्यताप्राप्त विद्यापीठ वा संस्थेतून पूर्ण केलेली असावी. पार्ट टाइम पीएचडी विद्यार्थी या इंटर्नशीपसाठी पात्र नसतील.

- पीएचडी केवळ फायनान्शिअल इकॉनॉमिक्सशी संबंधित विषयावर असावी.

- पदव्युत्तर पदवी पातळीवर किंवा समकक्ष सीजीपीएमध्ये किमान ६० टक्के अग्रीगेट गुण असावेत.

- वयोमर्यादा १ एप्रिल २०२० रोजी ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावी.

- उमेदवार भारतीय नागिरक असावा.

- स्टॅटेस्टिक्समधील माहिती आणि कौशल्य अवगत असणं बंधनकारक.

- R / Python चे ज्ञान आवश्यक.

डीयूच्या ओपन बुक परीक्षा ऑगस्टपर्यंत लांबणीवर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज