अ‍ॅपशहर

दहावी, बारावीच्या परीक्षा कधी? निकाल कधी? जाणून घ्या....

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत आणि बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2021, 4:06 pm
SSC HSC Exam Dates 2021: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत आणि बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ssc hsc exam 2021


वाचाः मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारीला

करोनासाठी आवश्यक ती काळजी घेऊन या परीक्षांचे नियोजन केले जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. परीक्षा झाल्यानंतर बारावी परीक्षांचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्या तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

वाचाः JEE Main आणि NEET परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता? जाणून घ्या...

निकाल कधी?
दहावी, बारावी परीक्षेचे निकाल कधी जाहीर केले जातील याबाबतची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दहावीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

वाचाः इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशात २० टक्क्यांनी वाढ

गेले अनेक दिवस लाखो विद्यार्थी परीक्षांच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत होते. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा विलंबाने होत आहेत.

वाचाः ऑनलाइन शिक्षणासाठी दिव्यांगांना मोबाइल देणे शक्य नाही; सरकारची भूमिका

वाचाः ऑनलाइन शिक्षणासाठी दिव्यांगांना मोबाइल देणे शक्य नाही; सरकारची भूमिका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज