अ‍ॅपशहर

दहावीच्या विद्यार्थ्यांना सैन्यात जाण्याची सुवर्णसंधी

सैन्यात अधिकारी पदाचं स्वप्न पाहणाऱ्या आणि यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो येथे लक्ष द्या. सैनिकी सेवापूर्व शिक्षण देणाऱ्या सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट (SPI) या औरंगाबादच्या शासकीय संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 4:51 pm
औरंगाबाद:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spi-aurangabad

सैन्यात अधिकारी पदाचं स्वप्न पाहणाऱ्या आणि यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो येथे लक्ष द्या. सैनिकी सेवापूर्व शिक्षण देणाऱ्या सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट (SPI) या औरंगाबादच्या शासकीय संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखत यांची तयारी करवून घेण्याच्या दृष्टीने पात्र उमेदवारांना SPI संस्थेत सैनिकी सेवापूर्व शिक्षण दिले जाते. SPI च्या जुलै २०२० ला सुरु होणाऱ्या सत्राकरिता राज्यस्तरीय लेखी आणि मौखिक स्पर्धा चाचणीतून फक्त ६० कॅडेट्स निवडले जातील. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासोबत औरंगाबाद मधील विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. कॅडेट्सना सकाळी ६ ते रात्रौ १० पर्यंत अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतवून ठेवले जाते जेणेकरून ते UPSC – UNION PUBLIC SERVICE COMMISSION ची कठीण लेखी परीक्षा व SSB – SERVICE SELECTION BOARD खडतर चाचण्यांना समर्थपणे तोंड देतील.

पात्रता :

- उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी हवा.
- त्याचा जन्म २ जुलै २००३ ते ३१ डिसेंबर २००५ दरम्यानचा असावा.
- उमेदवार मार्च/एप्रिल २०२० मध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
- शारीरिक पात्रता : उंची १५७ से.मी. वजन ४३ कि. ग्रॅ. छाती न फुगवता ७४ से.मी. फुगवून ७९ से.मी. दृष्टी- चष्मा लावून जास्तीत जास्त ६/९ तसेच रंगांधणेपणा नसावा. सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा.

लेखी परीक्षा : एप्रिल २०२० मध्ये

परीक्षा केंद्रे: पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि कोल्हापूर

परीक्षेचे स्वरुप : लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून होईल. परीक्षा एकूण १५० गुणांची असेल. गणित (७५ गुण), सामान्यज्ञान (७५ गुण) असे पेपर असतील. परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल. ही परीक्षा इयत्ता आठवी ते दहावीच्या राज्य मंडळ आणि सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. योग्य उत्तराला १ गुण मिळेल तर प्रत्येक चुकीच्या उत्तराचे ०.५ गुण वजा केले जातील.

परीक्षा शुल्क : ४५० रुपये.

अधिक माहिती आणि ऑनलाइन अर्जांसाठी विद्यार्थ्यांनी https://spiaurangabad.com/ या संकेतस्थळावर क्लिक करावे.

बारावी आणि दहावी परीक्षेचं पूर्ण टाइमटेबल येथे पहा

१०वी इंग्रजीत हमखास पास होण्यासाठी 'असा' सोडवा पेपर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज