Success Story: उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून अनेक पालक आपल्या मुलाचा जास्त फी असलेल्या खासगी शाळेत प्रवेश करतात. पण सरकारी शाळेत शिकून उच्च पद भूषविणारी अनेक उदाहरणे देता येतील.राजस्थानचे रहिवासी असलेले चंद्रशेखर मीणा यातीलच एक आहेत. आयआरएस अधिकारी बनण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांनी मेहनत तर केलीच पण अनेक वर्षे वाट पाहिली. त्यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया. चंद्रशेखर मीणा यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९९१ रोजी राजस्थानमधील दौसा येथे झाला. हनुमानगड येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांना दहावीमध्ये ८२.६ टक्के आणि बारावीमध्ये ८४.२ टक्के गुण मिळाले होते. यानंतर त्यांनी आयआयटी धनबाद येथून पदवी पूर्ण केली. यात त्यांचा सीजीपीए ७.८० होता. पदवीचे शिक्षण पूर्ण होताच शेखर यांनी सेल्फ स्टडीने यूपीएससीची तयारी केली. पदवीनंतर त्यांनी गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये १ वर्ष काम केले. त्यानंतर कोटाच्या एसबीआय, महावीर नगर शाखेत एक वर्ष पीओ म्हणून काम केले. पुढे ४ वर्षे नवी मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले. सरकारी नोकरीसोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.
पूर्णवेळ नोकरीमुळे शेखर यूपीएससी कोचिंगमध्ये सहभागी होऊ शकत नव्हते. त्यामुळे ऑनलाइन स्टडी मटेरियल, यूट्यूब व्हिडीओ आदींच्या माध्यमातून त्यांनी तयारी सुरु केली. त्यांनी चर्चेसाठी २०-२५ जणांचा गट तयार केला होता. मुख्य परीक्षेपूर्वी सर्वजण सुट्टी घेऊन एका ठिकाणी जमायचे. यानंतर ते मेन्ससाठी ऑनलाइन टेस्ट सिरिजमध्ये सहभागी झाले. चंद्रशेखर सध्या हल्दिया, कोलकाता येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.