अ‍ॅपशहर

एमफिल,पीएचडीच्या विद्यार्थ्यांना प्रकल्पांसाठी पुन्हा मुदतवाढ

एमफिल (M.Phil) आणि पीएचडी (Phd) करणाऱ्या विद्यार्थ्यांना थिसीस सबमीट करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा अवधी वाढवून मिळाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2020, 3:19 pm
Submission of Phd, Mphil Theses: कोविड - १९ महामारीमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एमफिल (M.Phil) आणि पीएचडी (Phd) करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना आता थिसीस सबमीट करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा वेळ मिळाला आहे. यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान यूजीसीने ३० जून २०२० पर्यंत असलेली थिसीस जमा करण्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केली होती. आता ती पुन्हा ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ugc extends deadline for submission of phd mphil theses
एमफिल,पीएचडीच्या विद्यार्थ्यांना प्रकल्पांसाठी पुन्हा मुदतवाढ


हा अतिरिक्त वेळ उमेदवारांना एव्हिडन्स ऑफ पब्लिकेशन आणि दोन कॉन्फरन्समध्ये उपस्थित राहण्यासाठी देखील दिला जाऊ शकतो. मात्र पीएचडी, एमफिल करणाऱ्या उमेदवारांचा एकूण संशोधन कालावधी मात्र पाच वर्षांचाच राहणार आहे, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊनमध्ये विद्यापीठे, महाविद्यालये गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनावर विद्यापीठांच्या प्रयोगशाळेत काम करता आलेले नाही, लायब्ररी सेवेचा वापर करता आलेला नाही. या गोष्टी संशोधन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असतात, परिणामी ही मुदतवाढ देत असल्याचे यूजीसीने निवेदनात म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज