अ‍ॅपशहर

देशातील ५६६ विद्यापीठांमध्ये पदवीच्या अंतिम सत्र परीक्षा

देशातील ५६६ विद्यापीठांमध्ये पदवी परीक्षा एकतर झाला आहेत किंवी होणार आहेत. ७०० विद्यापीठांनी आपली परीक्षांसंदर्भातील स्थिती यूजीसीला कळवली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jul 2020, 3:17 pm
नवी दिल्ली: देशभरातील एकूण ७५५ विद्यापीठांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतच्या त्या त्या विद्यापीठांतील स्थितीबाबतची माहिती कळवली आहे. यूजीसीने ६ जुलै रोजी देशातील सर्व विद्यापीठांना परीक्षांचे आयोजन करण्यासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम university exams 2020 over 700 universities inform ugc about status of exams
देशातील ५६६ विद्यापीठांमध्ये पदवीच्या अंतिम सत्र परीक्षा


ज्या ७५५ विद्यापीठांनी यूजीसीला आपल्या विद्यापीठातील परीक्षांसंदर्भातील माहिती कळवली आहे, त्यापैकी ३२१ राज्यातील विद्यापीठे, २७४ खासगी, १२० स्वायत्त आणि ४० केंद्रीय विद्यापीठे आहेत. यापैकी एकूण ५६६ विद्यापीठांनी त्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा एकतर यापूर्वीच घेतल्या आहेत, किंवा ती विद्यापीठे अंतिम सत्र परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आयोजित करणार आहेत.

एकूण ५६० विद्यापीठांपैकी १९४ विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत आणि ३६६ विद्यापीठांची ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये परीक्षेचे नियोजन करण्याची योजना आहे. यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यापीठांनी परीक्षांबद्दलची माहिती कळवली आहे त्यापैकी २७ खासगी विद्यापीठे आहेत. त्यापैकी काही विद्यापीठांनी यूजीसीला कळवले आहे की त्यांची पहिली बॅच अद्याप परीक्षेसाठी पात्र नाही.

IIT प्रवेश: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; 'ही' अट शिथील

कोविड - १९ विषाणूच्या संसर्गामुळे सर्व शैक्षणिक संस्था गेले चार महिन्यांपासून बंद आहेत. शनिवारपर्यंत देशभरात करोना संक्रमितांची संख्या १०, ३८,७१६ झाली आहे. गेल्या २४ तासात ३४,८८४ नव्या रुग्णांची भर पडली आहे तर ६७१ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६,५३,७५१ रुग्ण बरे झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज