अ‍ॅपशहर

UPSC पूर्व परीक्षेची तारीख उद्या होणार जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ३० मे रोजी होणार होती. ती आयोगाने लांबणीवर टाकली. २० मे रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील तारीख जाहीर करू असे आयोगाने म्हटले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2020, 4:12 pm
UPSC Civil Services Exam Date: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेबाबत बुधवारी २० मे रोजी घोषणा होणार आहे. आयोगानेच याबाबतची माहिती दिली होती. आयोगाच्या परिपत्रकात म्हटलं होतं की परीक्षेच्या तारखेबाबत जो निर्णय होईल तो २० मे रोजी जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम यूपीएससी परीक्षा


यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तारीख बुधवारी आयोगाच्या upsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर होईल. उमेदवार केवळ या वेबसाइटवरच परीक्षेची तारीख तपासू शकतील. आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार परीक्षेच्या एक महिना आधी परीक्षेची तारीख येईल. म्हणजेच तारीख जाहीर झाल्यानंतर उमेदवारांकडे तयारीसाठी एक महिन्याचा कालावधी असेल.

UPSC, बँकिंग परीक्षांसाठी AICTE चे फ्री कोर्सेस


नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसण्याची संधी मिळते. यानंतर, मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. अंतिम गुणवत्ता यादी मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारे तयार केली जाते. मुख्य परीक्षा १७५० गुणांची असून मुलाखतीला २७५ गुण असतात.

UPSC परीक्षेच्या तयारीसाठी वाचा NCERT ची 'ही' पुस्तकं

नागरी सेवा परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय महसूल सेवा (आयआरएस) ) आणि अन्य प्रशासकीय सेवांसाठी अधिकारी निवडले जातात. दरवर्षी सुमारे दहा लाख उमेदवार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी अर्ज करतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज