अ‍ॅपशहर

मृत्यूच्या क्षेत्रात

भारतीय शास्त्रज्ञांच्या गटाला बंगालच्या उपसागरात मोठ्या ‘मृत क्षेत्रा’चा नुकताच शोध लागला. आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आपण त्याचा आढावा घेऊया.

Maharashtra Times 24 Mar 2017, 12:17 am
पर्यावरण संतुलन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम environmental balance
मृत्यूच्या क्षेत्रात


महाभारतातील कथेत पांडवांनी खांडववन जाळले. पण पशुपक्ष्यांनी ते निर्वंश होतील, असा शाप त्यांना दिला. पांडवांचा एकमेव वारस परीक्षित याला तक्षकाने मारून प्रतिज्ञा पूर्ण केली. ही कथा पर्यावरणाचा शाप माणसाला कसा भोवतो, अशा प्रकारेही बघता येईल.

पर्यावरणीय अभ्यासामध्ये जलीय जैवविविधतेच्या अभ्यासाचे महत्त्व वाढत आहे. जलीय जैवविविधता पर्यावरणातील जैवचक्राचे संतुलन राखण्यास मदत करत असते. त्या चक्रात कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास संतुलन बिघडत असते. मृतक्षेत्राच्या (डेड झोन) निर्मितीचे महत्त्व समजून घेणे यामुळेच महत्त्वाचे ठरते. वाढती भौतिकता कोणती संकटे आणू शकते, याचे हे एक उदाहरण ठरावे.

मृत क्षेत्र

जलाशयातील 'मृत क्षेत्र' म्हणजे असे क्षेत्र ज्याचा तळ आणि तळानजीकच्या पाण्यामधील ऑक्सिजनचे प्रमाण अगदी कमी किंवा शून्य टक्के असते. (hypoxic) पाण्याच्या वरच्या भागात

असणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणाच्या दहा हजार टक्के ते प्रमाण कमी

असते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे मृत क्षेत्रात जीवसृष्टी धोक्यात येते. प्रामुख्याने जलाशयात मिसळणाऱ्या पोषणद्रव्याच्या अमर्याद प्रदूषणामुळे मृत क्षेत्र तयार होते. त्याच बरोबर काही नैसर्गिक बदल आणि मानवनिर्मित पर्यावरणीय धोक्याचे घटक या क्षेत्राच्या निर्मितीस कारणीभूत ठरत असतात.

तापमानवाढ हे कारण?

काही शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळातील मृत क्षेत्राच्या प्रसाराला जागतिक तापमानवाढही कारणीभूत मानले जात आहे. परंतु पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करण्यामागे फक्त तापमानवाढ हेच एकमेव कारण आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मृत क्षेत्राच्या निर्मितीस मुख्य कारण हे मानवनिर्मित प्रदूषण हेच असल्याचे मानले जात आहे. जसे बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूला जास्त लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश आहेत. खतांचा वापरही वाढत चालला आहे. या प्रदूषणनिर्मित घटकामुळे त्याभागातील सजीव मृत पावतात किंवा त्याभागातील अधिवास बदलतात.

संशोधन मोहीम

भारतीय शास्त्रज्ञांच्या गटाचा समावेश असलेल्या राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था, (NIO) गोवा या संस्थेला बंगालच्या उपसागरात जवळपास ६० हजार वर्ग मीटर क्षेत्रफळाचे मोठे मृत क्षेत्र आढळले आहे. पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात यापूर्वी अशाच प्रकारचे मृत क्षेत्र सापडले आहे.

‘नेचर जिओसायन्सेस’ या नियतकालिकांमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, या भागात सजीवांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे नायट्रोजनचा ऱ्हास झाल्याचे समोर येते .

या संशोधनानुसार संबंधित क्षेत्रामध्ये नायट्रोजन विस्थापित करणारे सूक्ष्मजीव आहेत. मात्र, या सूक्ष्मजीवांचा नायट्रोजन विस्थपनाचा वेग फारच कमी आहे, ही मात्र आश्चर्याची गोष्ट आहे.

समुद्रातील नायट्रोजन विस्थापनामुळे सागरी नायट्रोजन संतुलनावर परिणाम होतो. नायट्रोजन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.

तसेच जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे

सागरी उत्पादकानावर परिणाम होतो. जलीय जीवांच्या संरक्षणासाठी नायट्रोजनच्या चक्राचा समतोल असणे गरजेचे असते .

जगामधील इतर मृत क्षेत्रे

जलाशयातील ऑक्सिजनच्या प्रमाणात ऱ्हास झाल्यामुळे जगात यापूर्वी इतर भागातसुद्धा मृत क्षेत्रे निर्माण झाली आहेत. त्यातील सर्वात जास्त मृत क्षेत्रे उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीच्या जवळपास समुद्रात, नामिबियाच्या किनारपट्टीजवळील समुद्रात, बाल्टिक समुद्राच्या तळाच्या, मेक्सिकोच्या आखातात, आणि नुकत्याच सापडलेल्या बंगालच्या उपसागरात, भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळच्या अरबी समुद्रात मृत क्षेत्र आढळतात.

- भरत खताळ

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज