पाइपलाइन रोडः या रस्त्यावर श्रीराम चौक ते एकवीरा चौक दरम्यान धुळीची समस्या गंभीर बनली आहे. या रस्त्याच्या व दुभाजकाच्या कडेला माती जमा होत आहे. रस्त्यावर साफसफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही माती गोळा करून त्याचे ढिग दुभाजकाच्या बाजुला करून ठेवले आहेत. यामुळे रस्ते अरुंद होण्याबरोबरच माती उडत असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. - महावीर पोखरणा
दुभाजकाजवळ मातीचे ढिग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 5:44 am