अ‍ॅपशहर

बस थांब्याची दुरावस्था

Maharashtra Times 5 Dec 2016, 12:46 pm
नगर : महापालिकेच्या शहर बससेवेतील बसची दुरावस्था झाली आहेच, पण बसथांबेही दुर्लक्षित झाले आहेत. बससेवा सुरू होण्यापूर्वी बस थांबे उभारण्यात आले होते. प्रायोजकांच्या जाहिरातीही त्यासाठी घेण्यात आल्या होत्या. आता अन्य जाहिरातीही त्यावर असतात. मात्र, बसथांबा म्हणून या ठिकाणाचा प्रवाशांना काहीच उपयोग होत नाही. अनेक थांब्यांमधील बाके, खुर्च्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे तेथे प्रवाशांना बसता येत नाही. शिवाय अनेक ठिकाणी अतिक्रमणे असून बसथांब्याचा वेगळाच वापर करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासी थांब्यावर न थांबता रस्त्यावरच थांबणे पसंत करतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad condition of the bus stop
बस थांब्याची दुरावस्था


- अतुल सुपेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज