नगर : नगर-मनमाड रोडवरील झोपडी कँटीन ते भुतकरवाडी हा रस्ता अंत्यत खराब झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे काम करण्यात आलेले नव्हते. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. अलीकडेच महापालिकेने या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. खड्डे बुजविण्यात येऊन डांबराचा थर चढविण्यात आला आहे. त्यामुळे आता हा रस्ता चांगला झाला आहे. अशीच कामे खड्डे पडलेल्या अन्य रस्त्यांचीही होण्याची अवश्यकता आहे.- दिनेश कुलकर्णी
भुतकरवाडी रोडचे काम सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2017, 5:30 am