सावेडीपाइनलाइन रोड भागातील पद्मानगर येथे रस्त्यावरच एक दगड पडला आङे. एका दुकानासमोर टाकण्यात आलेला हा दगड रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठी अडथळा ठरत आहे. सुमारे पंधरा दिवसांपासून हा दगड येथे असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. हा रस्ता आधीच अरुंद असून खराब झालेला आहे. त्यावर अन्य नैसर्गिक अडथळे आहे. असे असूनही तेथे टाकण्यात आलेला दगड हटविण्यासाठी काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. प्रभाग अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.- नम्रता दोंता
सिटीझन रिपोर्टर- रस्त्यावर अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2017, 5:38 am