रस्त्यातील वाळूचा ढीग हटवाभिंगारभिंगार शहरातील ब्राम्हणगल्ली येथे रस्त्यातच वाळू टाकण्यात आलेली आहे. तेथे गटार योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी ही वाळू आणण्यात आली आहे. वाळूच्या ढिगामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे एकदम वाळू न आणता कामासाठी लागेल तेवढी आणून अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने साठा करणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी यात लक्ष घालून गैरसोय दूर करावी.-सागर चाबुकस्वार
रस्त्यातील वाळूचा ढीग हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2019, 5:40 am