दिल्लीगेटशहरातील दिल्लीगेट समोरील रस्त्यावरून अवजड वाहतुकीला बंदी आहे. मात्र, तेथून अवजड वाहतूक सुरूच असते. सध्या बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यातच अवजड वाहने आल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. रिक्षा, मालाची वाहतूक करणारे टेम्पो, दुचाकी अशी सर्व प्रकराची वाहने या अरुंद रस्त्यावरून जात असल्याने कोंडीत भर पडत आहे. किमान सणासुदीच्या काळात तरी पोलिसांनी यासंबंधी दक्षता घेण्याची गरज आहे.- दिनेश कुलकर्णी
दिल्लीगेटला अवजड वाहतूक सुरूच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2017, 5:36 am