वाडियापार्क: या भागातील रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत असून त्याची दुर्गंधी परिसरात सुटली आहे. ह्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी महापालिकेने तातडीने येथील ड्रेनेजची दुरुस्ती करून हा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ड्रेनेजची नियमित स्वच्छता करण्याचीही गरज आहे. - अबुजर सय्यद.....
ड्रेनेजची दुरुस्ती करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2019, 5:41 am