नगरभिंगारकडे जाणाऱ्या रस्त्यावर जीपीओ चौकाजवळ ड्रेनेजला गळती लागली आहे. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येते आहे. या ठिकाणी वाहने उभी केली जातात. नागरिकही वाहनांची वाट पहात थांबलेले असतात. घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वाहनचालक आणि नागरिकांना याचा त्रास होत आहे. संबंधित यंत्रणांनी याची दुरूस्ती करण्याची गरज आहे.- अरविंद मुनगेल
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2017, 5:36 am