माळीवाडाशहरातील कचरा संकलित करून तो मोठ्या वाहनांत भरण्यासाठी शाळांच्य दारात आणण्याचा अजब प्रकार नगर शहरात सुरू आहे. माळीवाड्यातील पालिकेच्या गॅरेजमध्ये कचरा डेपो करण्यात आलेला आहे. त्याच्याशेजारी शाळा आहेत. सकाळी शाळा भरण्याच्यावेळेस तेथे कचरा गाड्या भरण्याचे काम सुरू असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या कचरा गाड्यांमधून शाळेचे विद्यार्थी आणि स्कूलबस यांना वाट शोधत जावे लागते. हा कचरा डेपो अन्यत्र हलविण्याची नितांत गरज आहे. -दिनेश कुलकर्णी
शाळांच्या दारात कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2017, 5:34 am