नगर : पाइपलाइन रस्त्यावर मोकळ्या जागेत कचरा टाकण्याची नागरिकांची सवय आहे. एका जागेत असाच कचरा टाकला जात होता. त्यामुळे जागेच्या मालकाने कंपाऊंड घालून घेतले. तरीही नागरिकांची कचराफेक थांबलेली नाही. केवळ या परिसरातीलच नव्हे तर रस्त्याने येणारे नागरिकही वाहनावरून जाताना सोबत आणलेल्या कचऱ्याच्या कॅरीबॅग येथे भिरकावून देतात. कचराफेक करणाऱ्या अशा नागरिकांवर काहीच कारवाई केली जात नाही, त्यामुळे हे प्रकार सुरूच आहेत.- अरविंद मुनगेल
कचराफेक सुरूच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2017, 5:32 am