नगर : नागरदेवळे भागातील लक्ष्मीनगर येथील महादेव मंदिराजवळ कचरा साठला आहे. अनेक दिवसांपासून हा कचरा उचलेला नाही. सध्या पाऊस सुरू असल्याने कचरा सडत असून त्याची दुर्गंधी पसरत आहे. या परिसरात लोकवस्तीही आहे. तेथील नागरिकांना याचा त्रास होतो. नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने कचरा उचलण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.- सागर चाबुकस्वार
मंदिराजवळ कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2017, 1:00 pm