नगरः महापालिका शहर स्वच्छतेसाठी मोठी यंत्रणा राबवत असली तरी शहरातील अस्वच्छता काही कमी होण्याचे नाव घेत नाही. अनेक भागात उघड्यावर कचरा टाकण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानात आघाडी घेण्यासाठी एकीकडे महापालिका सर्व स्तरांवर प्रयत्न करीत आहे. त्यासाठी स्वच्छतेचे विविध उपक्रम, विविध अभियानांद्वारे जनजागृतीही करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. - महावीर पोखरणा
उघड्यावर कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2020, 5:44 am