भिस्तबाग रोडपाइपलाइन रोड ते भिस्तबाग या रस्त्यावर गजराज फॅक्टरीजवळ एक मोठा खड्डा पडला होता. त्यात पावसाचे पाणी साठत होते. त्यामुळे अपघातही होत होते. यासंबंधी 'सिटीझन रिपोर्टर'मध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली. त्याची प्रशासनाने दखल घेतली आणि हा खड्डा बुजविला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तूर्त तरी दिलासा मिळाला आहे. आता या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याची गरज आहे.- सागर चाबुकस्वार
भिस्तबाग रोडवरील खड्डा बुजविला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2017, 5:31 am