नगरः शहरातील महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळ अवजड वाहन पार्किंग करण्यात आले होते. या वाहनाचा वाहतुकीला अडथळा होत होता. मुळात नगरमध्ये अवजड वाहनांची पार्किंग करण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील काही रस्त्यांच्या कडेला अवजड वाहनांची पार्किंग केलेली दिसते. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. - संजोग सुडके
रस्त्याजवळच अवजड वाहन पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Oct 2019, 5:42 am