नगरः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. बाजारात सध्या मास्कचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच आता जिल्ह्यातील विविध महिला बचत गट कापडी मास्क बनवण्याचे काम युध्दपातळीवर करीत आहेत. या महिलांना घरबसल्या हे काम मिळाले असून या मास्कची विविध कार्यालयाकडून खरेदी केली जात आहे. यानिमित्ताने महिलांना रोजगार मिळाला आहे.- महावीर पोखरणा
घरबसल्या मिळाला रोजगार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2020, 5:44 am