सावेडीपाइपलाइन रोडजवळ बजरंग विद्यालयाच्या परिसरात एक कचराकुंडी आहे. तेथे नागरिक कुंडीजवळ न जाता बाहेरच कचरा टाकतात. अधिक माहिती घेतली असता असे आढळून आले की, कचराकुंडी नागरिकांना खूप दूर वाटते. त्यामुळे तिथपर्यंत त्यांना कचरा घेऊन जाणे शक्य होत नाही. ही कुंडी नागरीवस्तीच्या थोडी जवळ ठेवली तर कुंडीचा वापर वाढू शकेल. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तेथे जाऊन पाहणी करावी, नागरिकांशी चर्चा करावी आणि काही अडचण असल्यास ती दूर करावी, अशी अपेक्षा आहे.- अरविंद मुनगेल
कचराकुंडी जवळ ठेवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jul 2017, 5:37 am