नगरशहरातील तोफखाना भागात कचराकुंडीची पुरेशी सोय नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. मोकाट जनावरांमुळे हा कचरा रस्त्यावर पसरतो आणि सर्वांनाच त्याचा त्रास होतो. नीलक्रांती चौकाजवळ कचराकुंडीची सोय आहे. मात्र, ती या भागातील लोकांसाठी गैरसोयीची ठरते. त्यामुळे तोफखाना भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सोयीच्या ठिकाणी कचरा कुंडीची सोय करणे आवश्यक आहे. शिवाय उघड्यावर कचरा टाकण्यांवर कारवाईचीही अवश्यकता आहे.-अरविंद मुनगेल
कचराकुंडी जवळ हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2017, 5:35 am