नगर : नव्या पेठेत शहर सहकारी बँकेच्याजवळ रस्ता खचला असून तेथे मोठा खड्डा पडला आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. रस्त्यावर पडलेला हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे वाहने त्यात आदळतात. पावसाळ्यात हा खड्डा आणखी मोठा होण्याची शक्यता आहे. महापालिकेने यामध्ये लक्ष घालून हा खड्डा बुजविण्याची गरज आहे.- अरविंद मुनगेल
नव्या पेठेतील खड्डा बुजवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2017, 5:38 am