शहरामध्ये पार्किंग समस्या हा आता नेहमीचाच विषय झाला आहे. बाजारपेठेमध्ये सम-विषम तारखांप्रमाणे पार्किंगचे नियोजन करण्यात यावे, जेणेकरून रस्त्याची एक बाजू मोकळी राहात जाईल. तसेच ज्या रस्त्यावर जास्त वर्दळ असते, तिथे एकेरी वाहतूक करण्यात यावी. जेणेकरून वाहनांची गर्दी कमी होईल, आणि पार्किंगसाठी जागाही उपलब्ध होईल. तसेच प्रशासनाने देखील शहरांतर्गत असणाऱ्या मोकळ्या जागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. - प्रतीक हिंगडे......
सम-विषय तारखांप्रमाणे नियोजन हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2019, 5:46 am