अ‍ॅपशहर

तलावातील पाणी रस्त्यावर

Maharashtra Times 20 Jan 2017, 10:37 am
नगर : सिद्धिबाग येथील पोहण्याच्या तलावाची साफसफाई करण्यासाठी त्यातील पाणी रस्त्यावर सोडले जाते. मात्र, या ठिकाणी ड्रनेज तुंबलेले आहे. त्यामुळे हे पाणी वाहून न जाता रस्त्यावर साचते. बराच काळ पाणी साचल्याने रस्ता खराब होतो. तेथे पडलेले खड्डे आणखी वाढत जातात. अलीकडेच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे; मात्र, त्यावर पाणी सोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था संबंधितांनी करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pools of water on the road
तलावातील पाणी रस्त्यावर



- अरविंद मुनगेल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज