एक वर्षापूर्वी एसटी कॉलनी परिसरात एक लहान मुलगी मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडली होती. तेव्हापासून या विरोधात वातावरण आहे. या त्रासाने पीडित लोक महापालिकेवर मोर्चा नेत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून कुत्री पकडणाऱ्या संस्थेचे देणे बाकी आहे. चार हजार कुत्री पकडणाऱ्या संस्थेचे ६० लाख रुपये देणे बाकी असल्याचेही वृत्तही नुकतेच आले होते. मुळात एवढी कुत्री पकडून रस्त्यावर फिरणारी कुत्र्यांची संख्या वाढत असेल, तर संबंधित संस्था काम योग्य पद्धतीने करते का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. यावरून मोकाट कुत्र्यांना पकडल्यानंतर त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या संस्थेचे काम व्यवस्थित चालले आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभारण्याची गरज आहे. - दिनेश कुलकर्णी.....
समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा उभारावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2019, 5:42 am