अ‍ॅपशहर

दुभाजकावर रिफ्लेक्टर बसवावेत

Maharashtra Times 5 Dec 2016, 12:50 pm
नगर : नगर-औरंगाबाद रोडवरील धुळीने माखलेले दुभाजक स्वच्छ करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही समाधानकारक गोष्ट आहे. मात्र, या दुभाजकावरील रंग उडाला आहे, सर्वत्र पुरेसे दिवेही नाहीत. त्यामुळे अंधारात दुभाजक दिसत नाही. त्यावर जर रिफ्लेक्टर लावले तर दुभाजक लक्षात येतील. दुभाजकाला वाहने धडकून अपघात होण्याच्या घटना या महामार्गावर नेहमी घडतात. त्या टाळण्यासाठी त्यावरील धुळ हटविण्यासोबतच रिफ्लेक्टर बसविणेही आवश्यक आहे. याशिवाय येथे बसविण्यात आलेले लाइट कटरही बऱ्याच ठिकाणी निघून गेले आहेत. त्यामुळे रात्री वाहनचालकांना त्रास होतो. या सर्व अडचणी दूर करून महामार्ग अधिक सुरक्षित आणि अपघातरहित करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reflector placed on the divider
दुभाजकावर रिफ्लेक्टर बसवावेत


- महावीर पोखरणा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज