शहरातील अनेक दिशादर्शक फलकांवर विविध प्रकारच्या जाहीरातीचे स्टिकर्स चिटकवले जातात. त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असते. ते स्टिकर्स काढून संबंधितावर कारवाई करण्याची गरज असते. तसेच वाहतूक सिग्नलवरसुध्दा झाडाच्या फांद्या किंवा जाहिरातीचे फ्लेक्स लावले जातात, ते ही संबंधित यंत्रणांनी काढणे गरजेचे असते. शहरातील प्रत्येक सिग्नल सुरू आहेत का नाही ? ते व्यवस्थित दिसत आहेत का नाही, याची तपासणी संबंधित विभागांनी करण्याची गरज आहे. – अतुल सुपेकर
फलकांवर लावलेले स्टिकर्स काढावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2020, 5:44 am