सावेडीसावेडी उपनगर हा भाग जास्तीत जास्त कर भरणारा भाग म्हणून ओळखला जातो. अधिकारी-लोकप्रनिधीही ते मान्य करतात. मात्र, विकास कामांच्या बाबतीत या भागाकडे दुर्लक्ष केल जाते. सध्या आहेत, त्या सुविधाही व्यवस्थित राहतील याची काळजी घेतली जात नाही. पूर्वी बांधलेले रस्ते खराब झाले आहेत. त्यावरील पुलाचे कठडे तुटले आहेत. पथदिवे वाकले आहेत. गटारीतील घाण काढून रस्त्यावर टाकली आहे. उरलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. कर भरणारा नागरिक हा त्रास सहन करीत आहे आणि महापालिकेची सर्वच यंत्रणा याकडे डोळेझाक करीत आहे.- पुरुषोत्तम गांधी
सावेडीत रस्त्यांची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2018, 5:33 am