जिल्हाधिकारी कार्यालयआधीच डबघाईला आलेल्या एएमटी बससेवेचे बस स्टॉप हळूहळू गिळंकृत होऊ लागले आहेत. शहराच्या बाहेर असलेल्या अनेक बस थांब्यावर अतिक्रमणे झाली आहेत. आता मात्र, मध्यवर्ती शहरातही असे चित्र पहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्याजवळच असलेल्या बस स्टॉपमध्ये चपलांचे दुकाने थाटण्यात आले आहेत. काही विक्रेत दररोज येथे दुकाने लावतात. त्यामुळे तेथे प्रवाशांना थांबता येत नाही, शिवाय वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.- अड. शिवाजीराव कराळे
बस स्टॉपमध्ये दुकान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2017, 5:38 am