बांधकाम साहित्य जसे रस्त्यावर पडलेली वाळू, लोखंडी गज, पाइप, विटा, खडी हे छोटछोट्या अपघाताला निमंत्रण देतात. त्यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत असते. मुळात वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यास कारणीभूत असलेले रस्त्यावरील बांधकाम साहित्य वाहतूक नियंत्रण शाखेकडून जप्त करून बांधकाम साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. एखाद्या ठिकाणी सरकारी काम चालू असेल, व त्यांना बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्याशिवाय पर्याय नसेल, तर अशा ठिकाणी संबंधित सरकारी यंत्रणेने सूचना फलक लावून त्या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवण्याची गरज आहे. बांधकाम साहित्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही, याची काळजी संबंधित बांधकाम साहित्य ज्या व्यक्तीचे आहे, त्या व्यक्तीने घेणे गरजेचे आहे. तसेच बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांवर संबंधित यंत्रणेकडून कडक कारवाई केल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. - अबुजर सय्यद
कडक कारवाई करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2019, 5:40 am